नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी देखील एक लाखांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. मागील 24 तासात देशात 1लाख 31 हजार 968 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ही संख्या आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ही 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 वर जाऊन पोहचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान यापूर्वी गुरुवारी एकाच दिवसात देशात एक लाख 26 हजार 779 रुग्ण नव्यानं आढळले होते. सलग चौथ्या दिवशी देशात एक लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच देशात मागील 24 तासात 780 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख 67 हजार 642 इतकी झाली आहे. देशात सध्या नऊ लाख 79 हजार 608 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
India reports highest single-day spike with over 1.31 lakh new Covid-19 cases
Read @ANI Story | https://t.co/hd2JShVtuE pic.twitter.com/NEUpV1bOml
— ANI Digital (@ani_digital) April 9, 2021
मागील 24 तासात देशात 61 हजार 899 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 वर जाऊन पोहोचली आहे. ICMR ने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी 13लाख 64हजार 205 नमुने तपासन्यात आले आहेत. तर आतापर्यंत देशात 25 कोटी 40 लाख 41 हजार 584 नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच देशात आतापर्यंत नऊ कोटी 43 लाख 34 हजार 262 जणांना करोना लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group