मुंबई । येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, अशी माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवारांचा गौप्यस्फोट
तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपाला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही त्यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते.
भाजपाने धमक्या देत ज्यांचा प्रवेश करवून घेतला होता ते सर्व परत येतायत'; माजी आमदारानं केला राष्ट्रवादीत प्रवेश
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/K1RjWXqZpL@BJP4Maharashtra #HelloMaharashtra @MumbaiNCP @INCMaharashtra @ShivSena @AjitPawarSpeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 16, 2020
Big News
'या' जिल्ह्यांतील सरपंच आरक्षण सोडत रद्द!; राज्य शासनाचा नवा अध्यादेश जारी
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/nbK4wKQrmH#HelloMaharashtra #आरक्षण #ग्रामपंचायत_निवडणूक— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 16, 2020
मोदी सरकारचे कृषी कायदे अंबानींसारख्या उद्योगपतींसाठी; रिलायन्सच्या ऑफिसवर धडक मोर्चा काढणार- राजू शेट्टी
वाचा सविस्त👉🏽 https://t.co/J6WVJnMcEi@narendramodi @PMOIndia @BJP4Maharashtra #HelloMaharashtra @rajushetti #FarmersProtestHijacked #FarmerBill2020 #AmbaniAdaniKaPM— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’