नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्यापही नियंत्रण मिळालेलं नाही आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्याही ४० हजार झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील २४ तासात ५२ हजार ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५५ इतकी झाली आहे. यापैकी ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्ण बरं होऊन घरी परतले आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे मागील १० दिवसांपासून देशात ५० हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीनं दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. देशात ५० हजारांपेक्षा रुग्ण आढळून आलेला बुधवार हा सलग ७वा दिवस आहे. महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देशातील राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”