सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये ३४० जण बाधित आढळले आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी शंभर ते दोनशेच्यावर कोरोना बाधितांचा आकडा येऊ लागला आहे. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 19 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 340 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 7. 26 टक्के आला आहे. कोरोना सोबत ओमिक्राॅनचे प्रमाण वाढलेले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान सामोरे उभे राहताना दिसत आहे. कोरोना चाचणी बरोबर बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा –
दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने साध्या आजारांवर रुग्णांकडून उपचार न घेता औषध दुकानदारांकडून औषधे घेत उपचार केले जात आहेत. त्यामुळे औषध दुकानदारांनी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.