हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असेल, केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे अशी माहिती केसरकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
केवळ घोषणा न करता आपल्याला ही पदे भरायची आहेत याबाबत सविस्तर चर्चा कॅबिनेट बैठकीत झाली आहे अस केसरकर म्हणाले. खास करून बेरोजगार युवकांना या संध्या मिळाल्या पाहिजेत. जिथे आपल्याकडे अतिरिक्त स्टाफ आहे त्याला त्यामध्ये सामावून घेतले पाहिजे. खूप दिवसांनी भरती होत असल्याचे तरुण बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे असेही केसरकर यांनी म्हंटल.
शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून भरती केली जाणार आहे अस त्यांनी स्पष्ट केले.