राज्यात 24 तासात 8 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण; रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता अधिकच वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यात राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. तर, आज ४ हजार ९३६ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या मुद्द्यांच्या आधारावरच राज्यात यापुढील काळात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. करोनाची लस आली असली, तरी वाढत्या करोनाच्या फैलावाला आवर घालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत देखील वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.

दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’