लॉकडाउन तोडण्यात पुणेकर आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनली आहे. राज्यातील पुणे-मुंबईसह अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र, अशा स्थितीतही लॉकडाउन भंग करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २४ मार्च पासून ते ८ एप्रिल या कालावधीत २७ हजार ४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुणे शहर आघाडीवर आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात दिनांक २४ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन तोडणाऱ्या ४२६४ जणांवर भा.दं.वि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १६ हजार ६२९ जणांना लॉकडाउनचा भंग केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाईच्या नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. पुण्यातील बरेच लोक लॉकडाउनच्या काळात बाहेर पडत असल्यानं संचारबंदी उल्लंघनाचे सर्वाधिक गुन्हे पुण्यात दाखल झाले आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या अशा लोकांना पुणे पोलिसांनी दणका देत तब्बल १२ हजार १८१ वाहन जप्त केली आहेत.

पुण्याप्रमाणेच राज्यातील इतर शहरात सुद्धा लॉकडाउनचा भंग केल्याप्रकरणी मोठ्या संख्येत गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत अहमदनगरमध्ये २ हजार ४४९, नागपूरमध्ये १९९९, पिंपरी-चिंचवडमध्ये १९९३, मुंबईत १६७९ आणि नाशिकमध्ये १६४८ असे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment