मुलीच्या लग्नासाठी खर्च करावा लागेल म्हणून निर्दयी बापानं उचललं ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका बापानं आणि आईनं आपल्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला आहे. ही घटना बिहारच्या भोजपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. अजिमाबाद पोलिसांनी भीमपुरा गावातील कालव्याजवळून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या मुलीच्या हत्येचा आरोप तिच्या मामानं मुलीच्याच वडिलांवर आणि सावत्र आईवर लावला आहे. दोन दिवसांआधीच मृत मुलीच्या मामानं ती बेपत्ता असल्यानं संशय व्यक्त करत तिच्या वडिलांविरोधात आणि सावत्र आईविरोधात तक्रार दाखल केली होती. या मुलीच्या लग्नाचा खर्च करावा लागू नये म्हणून तिच्या बापानं आणि सावत्र आईनं तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. मृत मुलीचा अनेकदा छळ करण्यात आल्याचे मुलीच्या मामाने सांगितले आहे.

या मृत मुलीचे नाव दिव्या कुमारी असून ती तीन दिवसांपूर्वी घरातून अचानक गायब झाली होती. तिच्या मृतदेहाची ओळख न पटल्यानं पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आरा या ठिकाणी पाठवला होता. यानंतर घटनास्थळावरील फोटो मृत मुलीच्या मामापर्यंत पोहोचला. यानंतर तिचा मामा रुग्णालयात पोहोचला आणि ही दिव्याच असल्याचं त्याने पोलिसांना सांगितले. मृत मुलीला कोणीही भाऊ किंवा बहीण नाही आणि तिच्या वडिलांनी 13 वर्षांपूर्वी तिच्या आईचीदेखील अशाच प्रकारे हत्या केली होती असे मुलीच्या मामाने सांगितले आहे. पोलिसांनी सध्या मुलीच्या सावत्र आईला ताब्यात घेतलं आहे. तर, आरोपी बाप अजूनही फरार आहे.

Leave a Comment