पुणे प्रतिनिधी | जन्म देणार आईच मुलांचा जगण्याचा हक्क हिरवणारी ठरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात आईने तीन मुलांना गळपास लावून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने भोसरी परिसरात खळबळ माजली असून मयत लहान मुलांप्रती हळहळ व्यक्त केली जात आहे.
अल्फीया बागवान (९), जोबा बागवान (७), जिआन बागवान (६) अशी मयत मुलांची नावे आहेत. तर फातिमा आक्रम बागवान असे आत्महत्या करण्याऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान या महिलेने राहत्या घरी आपल्या मुलांना फाशी दिली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली.फातिमाचा नवरा अक्रम काहीच काम करत नव्हता. घरात नेहमी आर्थिक चणचण असायची. त्यामुळे घरात सतत भांडणे होत असत. त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून फातिमा बागवान या महिलेने हे विचित्र पाऊल उचलले असे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार
गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणुकीतून माघार ; या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत
कराड येथील जुना कृष्णापूल कोसळला
मुंबईनंतर राष्ट्रवादीला बसणार नव्या मुंबईमध्ये झटका ; पवारांचा निकटवर्तीय नेता भाजपच्या वाटेवर
येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा