हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईमधल्या मुलुंड येथे राहणाऱ्या एका जन्मदात्या आईनेच आपल्या 39 दिवसांच्या बाळाला बिल्डिंगमधून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 14 मजली बिल्डिंगमधून क्रूर आईने आपल्या बाळाला फेकून दिले. ज्यामुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुलुंड परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे. ज्यामधून, आई मानसिक तणावात असल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मुलुंड येथील निळकंठ अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये मनाली मेहता नावाची महिला सुरतहून आपल्या माहेरी आली होती. काही दिवसांपूर्वीच मनालीचे वडील एक्सपायर झाले होते. ज्यामुळे ती मानसिक धक्क्यातून बाहेर आली नव्हती. मनालीच्या वडिलांचा तिच्या बाळावर खूप जीव होता. त्यामुळे बाळाला पाहिल्यानंतर मनालीला सतत वडिलांची आठवण येत होती. मानसिक तणावाचा मनालीवर एवढा परिणाम झाला होता की ती सतत म्हणायची, बाळाला तिचे आजोबा बोलवत आहेत. परंतु घरचे तिची सध्या समजूत काढत होते.
त्यानंतर काल मध्यरात्री पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उठली आणि तिने आपल्या 39 दिवसांच्या बाळाला बेडरूमच्या खिडकीमधून बाहेर खाली फेकून दिले. हे बाळ थेट बिल्डिंगच्या खाली असलेल्या एका दुकानावर पडले. सकाळी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हे बाळ दुकानाच्या छतावर पडलेले पाहिले. त्यानंतर त्वरित पोलिसांची संपर्क साधला गेला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बाळ ताब्यात घेतले. परिसरात चौकशी केल्यानंतर हे बाळ म्हणाले ते असल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान, या सर्व घटनेचा तपास करताना पोलिसांना आढळून आले की, वडिलांच्या निधनाचा मनालीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे तिच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू होते. मनालीने यापूर्वी देखील आपल्या पहिल्या बाळाला गमावले होते. त्यानंतर आता पुन्हा मनालीच्या 39 दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेचा मनालीला देखील तितकाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून वैद्यकीय उपचार प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.