धक्कादायक ! बहिणीचा विवाह 2 दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू

Nashik Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये (Nashik) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असतांना एकुलत्या एक अठरा वर्षीय भावाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे (Nashik) सिन्नर तालुक्यातील दातली येथील लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण घरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवघ्या दोन दिवसांवर कुटुंबातील मुलीचा विवाह असल्याने दातली येथील चांदोरे कुटुंबियांत आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी दुपारी शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल गटारात कोसळून पलटी झाला. या दुर्घटनेत चालकाच्या बाजूला बसलेला ओमकार चिंतामन चांदोरे याचा ट्रॅक्टर खाली येऊन जागीच मृत्यू झाला.

ओमकार चांदोरे याच्या अपघाती मृत्यूने लग्नघरी मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. त्याच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद इप्पर, सचिन काकड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं