औरंगाबाद : राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता, असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उद्या स्वातंत्र्य दिनी खासदार जलील पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहेत. अशी माहिती खासदार जलील यांनी सोशल मिडियावर एका व्हिडिओद्वारे दिली आहे.
तसेच पालकमंत्र्यांना काळे दाखवण्यासाठी जलीलांनी जनतेला देखील आवाहन केले आहे. यावेळी बोलाताना जलील म्हणाले की, सुभाष देसाई हे पालकमंत्री आहेत. ते आपले पालक आहेत. त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावेच लागतील. तसेच सकाळी 9 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वा नागरिकांनी उपस्थित राहून पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवावे असे आवाहान देखील केले आहे.
खासदार जलील पालकमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे pic.twitter.com/6DC11go70s
— Hello Maharastra Aurangabad (@AurangabadHello) August 14, 2021
दिवसभर करणार पालकमंत्र्यांचा पाठलाग –
उद्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाल्यावर पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवताना पोलिसांनी अडवले तरी आम्ही ते विमानतळावर जाईपर्यंत त्यांचा पाठलाग करुन त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. तसेच त्यांचा घेराव घालून त्यांना जाब देखील विचारणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. तसेच हा काही एका पक्षाचा निषेध नसून प्रत्येक औरंगाबादकराने यात सहभागी व्हावे असे आवाहन देखील खासदार जलील यांनी केले आहे.