पंतप्रधान मोदींची खा. रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली सहकुटुंब भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतीच सहकुटूंब भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींशी चर्चा करत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पास भरीव पॅकेज द्यावे, अशी मागणी केली.

दिल्ली येथे पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी खा. निंबाळकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे व इंदिराराजे या उपस्थित होत्या. यावेळी खा. निंबाळकरांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ,तेलंगाना, या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावा. तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रकल्प मार्गे लागावी यासाठी विशेष योजना तयार करून या 55 दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत. हे दुष्काळी तालुके परंपरागत दुष्काळी म्हणूनच आजही गणले जातात. त्यामुळे लक्ष घालून या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निंबाळकर यांनी केली.

तसेच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारने निरा-देवघर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचे सांगितले. या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी त्यांनी मागणी केली. तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम-बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आता आठमाही होणार आहे.

https://www.instagram.com/p/CqKRUULtr1D/

तो बारमाही करण्यासाठी काही योजना करता येईल का? यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे काटापुर योजनेसाठी निधी दिलेला असल्यामुळे हा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या भागाचा दौरा करावा अशी विनंती खा. निंबाळकरांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही दिली असल्याचे ख. निंबाळकर यांनी सांगितले.