EWS आरक्षण घेतल्यानं धोका होणार नाही का ?? संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आला. दरम्यान मराठा समाजाला EWS आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मराठा संघटना आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. EWS आरक्षण घेतल्यानं मराठा समाजाला धोका होणार नाही हे सरकारनं सांगावं असं आव्हान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला केलं आहे.

EWS आरक्षण हे सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे. ते केवळ मराठा समाजासाठी नाही. EWS आरक्षण घेतल्यानं SEBC आरक्षणाला धोका निर्माण होईल, अशी शक्यता संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चांगला निर्णय अपेक्षित असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

OBC समाजात भीती निर्माण झाली हे खरं आहे. मात्र, OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आपण आजही वाट पाहत आहोत. पण अद्याप त्यांचा वेळ मिळाला नसल्याची खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment