हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने कहर केला असून जनतेची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर11 तारखेला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
खर तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यापूर्वीच ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आक्रोश करत परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्यामुळं नाईलाजाने सरकारला परीक्षेचा निर्णय घ्यावा लागला होता. अखेर आता विद्यार्थ्यांनीच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्याने राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलन्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 9, 2021
दरम्यान, यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page