MPSC परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक; अजिय पवार आणि अनिल परब यांच्याशी आज चर्चा

मुंबई । MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालं आहे. आज उपमुख्यमंत्री अजिय पवार आणि अनिल परब मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याविषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.

राज्यात एमपीएससीसाठी अडीच लाख विध्यार्थ्यांपैकी सुमारे 80 हजार विध्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून अर्ज केला आहे. पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनी नेमकं कुठल्या प्रवर्गातून परीक्षेला बसावं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच EWS प्रवर्गातून परीक्षेला बसल्यास आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आज रात्रीपर्यंत याबाबत तोडगा निघाला नाही तर मातोश्रीबाहेर उद्या आंदोलन अटळ आहे अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतलेली आहे.

दरम्यान, अनेक मराठा तरुणांना नियुक्ती ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही. आरक्षण मिळेल, पण तुमच्या हातात जे आहे ते आधी करा, याला इशारा समजा किंवा विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय 2014 ते 2020 पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? त्या विरोधात याचिका दाखल करू, असा इशारा देत आरक्षणाच्या लढ्या संदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी, असं देखील संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like