MPSC च्या शेकडो विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन; राज्य सरकारकडे केली महत्वाची मागणी

MPSC students protested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. नागपुरात अधिवेशन सुरु होताच 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने याला विरोध म्हणून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आज रत्यावर उतरत आंदोलनाचे हत्यार उपसले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, अशी महत्वाची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

पुण्यातील नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर शेकडो विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरत राज्य सरकारचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. अभ्यासक्रमातील बदलास विरोध करत नव्या अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही तर पुन्हा मोठं आंदोलन करु, असा इशारा विद्यार्थांनी सरकारला दिला आहे.