राहुल गांधींवर गुन्हा दाखल; KGF 2 चं थेट कनेक्शन??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर असून या माध्यमातून ते थेट लोकांशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. या दरम्यान, काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांच्यासहित काही काँग्रेस नेत्यांवर KGF Chapter 2 फेम MRT म्युझिकने कॉपीराइट कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

एमआरटी म्युझिक, बंगळुरू येथील एक रेकॉर्ड लेबल जे कन्नड, हिंदी, तेलुगू आणि तमिळ इत्यादी 20,000 हून अधिक गाण्यांचे संगीत हक्क धारण करते. हिंदीतील KGF Chapter 2 च्या म्युझिकचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे आणि काँग्रेसने ‘स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी’ या म्युझिकचा वापर केला आहे. हे म्युझिक आमची परवानगी न घेता वापरले आहे असं एमआरटी म्युझिकने आपल्या तक्रारीत म्हंटल आहे.

एमआरटी म्युझिक कंपनीनं राहुल गांधी, सुप्रिया श्रीनाटे आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसच्या तीन नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर), 465 (बनावटीसाठी शिक्षा), 120 (कारावासाच्या शिक्षेस पात्र गुन्हा करण्यासाठी डिझाइन लपवणे), कलम 34 (सामान्य हेतू), माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 चे कलम 66 असे आरोप लावले. आणि कॉपीराइट कायदा, 1957 च्या कलम 63 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.