Monday, February 6, 2023

धोनीचा जडेजाला ‘तो’ सल्ला अन मॅक्सवेलची दांडी गुल {video}

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्सने दमदार फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघावर दणदणीत विजय मिळवत विराट सेनेचा विजयी अश्वमेध रोखला. अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात चेन्नईसाठी हिरो ठरला. जडेजाने दमदार कामगिरी करत 28 बॉलमध्येच 221.43 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 62 धावा केल्या. तर गोलंदाजी मधेही तब्बल 3 बळी घेतले.

दरम्यान जडेजा गोलंदाजी करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला मोलाचा सल्ला दिला जो कॅमेरा मध्ये रेकॉर्ड झाला. जडेजा 9 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आल्यावर हा प्रकार घडला. जडेजाच्या समोर ग्लेन मॅक्सवेल बॅटींग करत होता. त्यावेळी धोनीनं जडेजाला ‘मारने दे, सोच के मार मत खाना’ असा सल्ला दिला. धोनीनं हा सल्ला देताच पुढच्याच बॉलवर जडेजानं मॅक्सवेलला बोल्ड केलं. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -

https://twitter.com/pant_fc/status/1386309501658099717?s=20

दरम्यान यंदा चेन्नईचा संघ पुन्हा एकदा आपल्या जुन्या लयीत आला असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर इतरांपेक्षा वरचढ ठरत आहेत. कर्णधार धोनी वेळोवेळी नवोदितांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतो. आणि त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स चा आत्मविश्वास वाढलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.