MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ

MS Dhoni
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त असला तरीही त्याच्या लोकप्रियतेत कमतरता आलेली नाही. आपल्या निवृत्ती नंतरही तो सर्वात लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक ठरला आहे. आता धोनीने नवीन आयपीएल हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. सीएसकेचा कर्णधार असलेला धोनी एका जाहिरातीमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

IPL 2023: माही बने पुलिस अफसर, सोशल मीडिया पर छाए MS Dhoni - Bharat Express  Hindi

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये धोनीने (MS Dhoni) पोलिसांचा खाकी ड्रेस घातलेला दिसून येत आहे. पोलिस म्हणून तो उठूनही दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसांपूर्वीच आणखी एका व्हिडीओमध्ये धोनी आयपीएल सीझनपूर्वी नेटमध्ये सराव करत असताना षटकार मारताना दिसला होता.

IPL 2023: पुलिस अफसर बने MS Dhoni, सोशल मीडिया पर धूम मचा रहा दबंग अवतार

धोनीच्या व्यायामाचे व्हिडिओ

CSK च्या फॅन पेजवर धोनीच्या सरावाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये धोनी (MS Dhoni) कसा शॉट्स खेळत आहे आणि कसा बचाव करत आहे हे दिसून येते. हे जाणून घ्या कि, धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले आहे. तसेच तो फक्त आयपीएलच खेळतो. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही लीगमध्ये तो सहभागी होत नाही. 41 वर्षांचा असलेला धोनी फिटनेसच्या बाबतीत आजही सध्याच्या अनेक क्रिकेटपटूंना मागे टाकू शकतो. मात्र मैदानावर उतरण्यासाठी सराव आवश्यक असल्याने धोनीने आयपीएलपूर्वीच सराव सुरू केला आहे.

Watch: Guess who paid a surprise visit to team India dressing room before  New Zealand T20 in Ranchi | Mint

धोनीने (MS Dhoni) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय क्रिकेटपटूंची भेट घेतली. यावेळी बहुतांश खेळाडूंबरोबर त्याने चर्चा केली. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही याबाबत माहिती दिली.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.instagram.com/mahi7781/?hl=en

हे पण वाचा :
Budget 2023 : विदेशी खेळणी महागणार, खेळण्यांवरील आयात शुल्कात झाली 70% वाढ
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील
LIC Dhan Varsha Plan मध्ये गुंतवणूक करून मिळवा 10 पट नफा, अशा प्रकारे तपासा यासाठीची पात्रता
आता Driving Licence शिवाय चालवता येणार गाडी !!! सरकारने सुरु केली ‘ही’ सुविधा
IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील