हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 ला अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच चेन्नई सुपर किंग्स ला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
महेंद्रसिंग धोनी ने आत्तापर्यंत चेन्नईचे दमदार नेतृत्त्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवले आहे. तर तब्बल 4 वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. त्यामुळे धोनी कर्णधार पदावरून पाय उतार झाल्याने चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी चेन्नई संघाने जडेजा आणि धोनीसह 4 खेळाडूंना कायम ठेवले होते. जडेजाला फ्रँचायझीने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. तर धोनीला या मोसमात केवळ 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले होते. यावरून जडेजाला कर्णधार बनवता येईल, असा अंदाज सुरुवातीपासूनच होता. त्याच्याशिवाय मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींसाठी कायम ठेवण्यात आले आहे.