Wednesday, October 5, 2022

Buy now

“…ये डर होना जरुरी है”; ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या बाबतीत एक विधान केले होते. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हाड यांचा उल्लेख न करता ट्विटरवरुन मोजक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “ ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है …ये डर होना जरुरी है!”, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. पाटील यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काही जण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत. ईमानदारी और सच्चाई का ये डर अच्छा है …ये डर होना जरुरी है !,” असे ट्विटमध्ये पाटील यांनी म्हंटले आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका केली जाणार हे नक्की.