Tuesday, January 31, 2023

धोनीला खेळताना पहायला आवडेल, पण…सुनील गावस्करांचा सूचक ईशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी, आयपीएलमधून पदार्पण करत पुन्हा संघात येईल असं वाटत असतानाच कोरोनाव्हायरसमुळे आयपीएलसुद्धा होणार की नाही ही शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत धोनी संघात येईल असं मानलं जात असताना सुनील गावस्कर यांनी सध्या वेगळाच खुलासा केला आहे. “संघ आता महेंद्रसिंग धोनी शिवायही पुढे जायला शिकला आहे. त्यामुळे धोनीची उणीव वगैरे काही वाटत नाही. स्वतः धोनीलाही याची जाणीव असून संघात निवड होण्याची वाट बघण्याआधीच तो शांतपणे बाजूला होईल” असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.

- Advertisement -

आता गावस्कर यांच्या प्रतिक्रियेवर धोनी काय बोलणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महेंद्रसिंग धोनीला सन्मानाने निवृत्त होऊ द्यावं अशी देशातील करोडो क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. मात्र ज्यांच्यासाठी लोकभावनेपेक्षा प्रत्यक्ष खेळ महत्वाचा असतो ते यातून कसे पुढे जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.