Friday, January 27, 2023

कोरोना पोहोचला संसदेत? कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या संपर्कात आला होता ‘हा’ खासदार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची कबुली दिली आहे. कनिका लंडनहून लखनऊला आली होती. त्यानंतर लखनऊमध्ये एका हाय प्रोफाइल पार्टीमध्ये तिने हजेरी लावली होती. माजी खासदार अकबर अहमद डंपी यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी ही हाय प्रोफाइल पार्टी झाली होती. अनेक बडे नेते आणि न्यायाधीशांसह सुमारे ३०० लोक या पार्टीत उपस्थित होते. दरम्यान, या पार्टीत खासदार दुष्यंत सिंग सुद्धा सहभागी झाले असल्याची माहिती मिळत आहे. खासदार दुष्यंत सिंग राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराजे सिंधिया यांचे चिरंजीव आहेत. विशेष म्हणजे या पार्टीत वसुंधरा राजे सुद्धा सहभागी असल्याचं छायाचित्र समोर आलं आहे.

कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाल्यानंतर खासदार दुष्यंत सिंग यांनी संसेदत हजेरी लावली. त्यामुळं आता एका करोना पॉसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या खासदार दुष्यंत सिंग यांच्या संसदेत हजेरी लावल्यानं करोनाच संकट संसदेत सुद्धा पोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर खासदार दुष्यंत यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट सुद्धा घेतल्याची माहिती एका वृत्तवाहीने दिली आहे. त्यामुळं संसद आणि राष्ट्रपती भवनासारख्या हाय प्रोफाइल परिसरात करोनाचा शिरकाव तर झाला नाही याची भीती आता निर्माण झाली आहे. कनिका पॉझिटिव्ह आढळल्यानंतर वसुंधरा राजे यांनी स्वत: ला क्‍वारंटाईन केलं असल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, दुष्यंत सिंग यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्याचं वृत्त मिळत आहे.

- Advertisement -

Untitled design (28)दरम्यान, कनिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची कबुली दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘गेल्या ४ दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसत होती. चाचणी केल्यानंतर मला करोनाची लागण झाल्याचे मला कळले असून मी आणि माझे कुटुंब आता पूर्णपणे एकांतात आहोत. पुढे काय करावे याबद्दल आम्ही संपूर्ण वैद्यकीय सल्ला घेत आहोत.”

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..

कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे

जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा

लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा