हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 15 ऑगस्टला अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर देशभरातून धोनीसाठी शुभेच्छाचा वर्षाव झाला. धोनीचे चाहते,कलाकार, तसेच राजकिय नेत्यांनीही धोनीच्या कामगिरी बद्दल त्याचे आभार मानले. त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक खास पत्र लिहून धोनीचे कौतुक केले आणि त्याला त्याच्या भावी वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धोनीने स्वतः ट्विट करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/msdhoni/status/1296362680580636672?s=20
धोनीने म्हटले आहे की, एक कलाकार, एक सैनिक आणि एक खेळाडू यांना प्रशंसेची भूक असते. त्यांची मेहनत आणि त्यागाची प्रत्येकाने दखल घ्यावी, असे त्यांना वाटत असते. तुम्ही केलेली प्रशंसा आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे, असे धोनीने सांगितले.
यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही धोनीच्या निवृत्तीनंतर त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या अनोख्या शैलीने धोनीने नेहमीच सर्वांना मंत्रमुग्ध केले. आगामी काळातही तो भारतीय क्रिकेटविश्वासाठी योगदान देत राहील, अशी आशा मी करतो. माही, जागतिक क्रिकेट हेलिकॉप्टर शॉटची आठवण काढेल, अशी स्तुती अमित शाह यांनी केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’