खुशखबर ! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार ‘धोनी’..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। शुभम भोकरे
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.

निवृत्तीनंतरही धोनी कसोटी सामन्यात दिसू शकतो. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना १९ ऑक्टोबरला रांची येथे होणार आहे. यासाठी भारतीय संघ १५ ऑक्टोबरला रांचीला पोहचेल. दरम्यान, या सामन्याच्या आयोजकांनी चाहत्यांना सराव पाहण्याची संधी दिली आहे. त्यामुळं टीम इंडियाच्या सराव सत्रात धोनीही उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धोनीनं २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या धोनी फक्त एकदिवसीय आणि टी-२० संघाचा हिस्सा आहे. त्यातही धोनी गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळं धोनी आता एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. वर्ल्ड कप २०१९ नंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी थेट टी-२० वर्ल्ड कप खेळणार असल्याच्या चर्चा आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment