MS Dhoni : देशातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL २०२४ येत्या 22 मार्च पासून सुरु होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणजे महेंद्रसिंघ धोनी…. चेन्नई सुपर किंग्सचे यशस्वीपणे नेतृत्व करणारा धोनी फक्त मैदानावर जरी दिसला तरी त्याच्या नावाने प्रेक्षक जल्लोष करताना आपण पाहतो. फक्त चेन्नईच नव्हे तर विरोधी संघातील खेळाडूं आणि चाहतेही धोनीचा आदर करतात. वाढत्या वयामुळे धोनी यंदाची आयपीएल खेळणार का यावरून त्याच्या चाहत्यांच्या मनात संभ्रम होता. मात्र आता धोनीचा सराव करतानाच एक विडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्याचे चाहते चांगलेच खुश होतील.
IPL 2024 ची सुरुवात 22 मार्च रोजी CSK आणि RCB यांच्यातील सामन्याद्वारे होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ग्जचे होम ग्राउंड असलेल्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने चेन्नईच्या संघाने 2 मार्चपासून आपल्या सराव शिबिराला सुरुवात केली आहे. यापूर्वी रुतुराज गायकवाड, सिमरजीत सिंग, दीपक चहर यांच्यसह बाकी खेळाडूंनी सराव केला. त्यानंतर महेंद्रसिंघ धोनी मैदानात उतरला. मैदानात धोनीच्या एंट्रीचा विडिओ व्हायरल झाला आहे.
Exclusive Video, Glimpses of Thala Dhoni from Today’s Practice Session in Chepauk !! 🔥🙏#MSDhoni | #WhistlePodu | #IPL2024 | #CSK
— TEAM MS DHONI #Dhoni (@imDhoni_fc) March 7, 2024
🎥 via Lavz15/IG pic.twitter.com/PYeumHVU57
धोनी सर्वात यशस्वी कर्णधार – MS Dhoni
दरम्यान, महेंद्रसिंघ धोनी हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत गणला जातो. धोनी २००८ पासून चेन्नईचे नेतृत्व करत असून आपल्या कल्पक नेतृत्व आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला त्याने अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. धोनीने (MS Dhoni) तब्बल ५ वेळा चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल चॅम्पियन केलं आहे.
कसा आहे चेन्नईचा संघ –
एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, शिवम दुबे, महेश टेकशाना, मिचेल सँटनर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, राजकुमार सिंह, राजकुमार सिंह, राजकुमार सिंह , शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, अजय मंडल, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रवींद्र, अवनीश राव आर्वेली.