नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा झाला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणारा धोनी आता फक्त आयपीएल खेळतो आहे. आता असा अंदाज वर्तविला जात आहे की, धोनी लवकरच आयपीएलला देखील निरोप देणार आहे, पण या दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी धोनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून किती काळ खेळत राहील याबाबत सांगितले. आयपीएल 2021 नंतर धोनीचा चेन्नई सुपर किंग्जबरोबरचा करार संपुष्टात येईल, पण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मत वेगळे आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने IANS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,”धोनी आता तंदुरुस्त आहे आणि त्याच्यामधे अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.” काशी विश्वनाथन म्हणाले, ‘धोनी चेन्नई सुपर किंग्जबरोबर आणखी एक किंवा दोन वर्ष राहू शकेल. धोनीने क्रिकेट सोडण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. जिथपर्यंत आमचा प्रश्न आहे, आम्ही त्यांच्याबरोबर खूप आनंदी आहोत. हे फक्त कर्णधारपदाबद्दलच नाही तर तो अजूनही संघासाठी एक उत्तम खेळाडू आहे. तो फिनिशर असून तो ही भूमिका चांगल्या रीतीने निभावत आहे.” आता चेन्नईच्या सीईओच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, त्यांची टीम आगामी हंगामासाठी धोनीला राखून ठेवणार आहे.”
धोनी चौथ्यांदा चेन्नईला चॅम्पियन बनवू शकतो
एमएस धोनी पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने 8 अंतिम सामने खेळले त्यापैकी संघाने तीन वेळा विजय मिळविला. आयपीएल 2021 थांबेपर्यंत चेन्नई सुपर किंग्जची स्थिती मजबूत होती. पॉइंट टेबलमध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या या संघात या मोसमात जिंकण्याची क्षमता आहे.
आयपीएलमधील धोनीचा अप्रतिम विक्रम
एमएस धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. धोनीने 211 सामन्यात 40.25 च्या सरासरीने 4669 धावा केल्या आहेत. धोनीने एकूण 217 षटकार लगावले आहेत. मात्र, गेल्या दोन मोसमांमधून त्याची बॅट शांत दिसत आहे. पण एक कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून त्याची जलवा आजही कायम आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा