औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळातील व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लाख 30 हजार 89 ग्राहकांकडे 392 कोटी 66 लाखांचे वीज बिल थकले आहे. ग्राहक विजेचे बिल नियमित भरत नाहीत. त्यामुळे महावितरणने थकबाकीदरांचा विजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर विजपुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरसमोर पर्याय उरलेला नाही, असे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी सांगितले.
विज बिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले आहेत. त्यामुळे ग्राहक अडचणीत सापडले असून ऑनलाइन शिक्षण कामकाजाचा खोळंबा होत आहे. महावितरणने सर्वत्र यंत्रणा थकबाकी असून थकबाकी विरोधात यापुढेही धडक मोहीम सुरू राहणार आहे. महावितरणने वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्राचा व घरबसल्या ऑनलाइन पेमेंट साठी www.mahadiscom.in या संतोष रावळ किंवा महावितरणाच्या मोबाईल ॲपच्या पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीत औरंगाबाद शहर 1 लाख 71 हजार 999 ग्राहकांकडे 163 कोटी 97 लाख, औरंगाबाद ग्रामीण दोन लाख 17हजार 805 ग्राहकांकडे 105 कोटी 63 लाख, तर जालना शहर व जिल्हा 1 लाख 40 हजार 285 ग्राहकांकडे 123 कोटी 6 लाखांची थकबाकी आहे.