हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Muhurat Trading 2022 : दिवाळी लवकरच येणार असल्यामुळे सध्या देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याकाळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. दिवाळीचा दिवस हा शेअर बाजारासाठी देखील खूप खास असतो. मात्र या दिवशी बाजार बंद असला तरी एक तासासाठी खास मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तासच ट्रेडिंग होते. या एका तासामध्ये अनेक गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून शेअर बाजाराची परंपरा पाळतात. जर आपणही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या शुभ दिवशी पैसे गुंतवता येतील. कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
यावेळी NSE आणि BSE वर 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading 2022) केले जाईल. यादिवशी संध्याकाळी 5.45 ते 6 या वेळेमध्ये ब्लॉक डील होणार आहे. दोन्ही एक्सचेंजेसने दिलेल्या माहिती नुसार, यादिवशी संध्याकाळी 6:00 ते 6:08 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सेशन असेल. यानंतर 6.15 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल. चला तर मग आज आपण मुहूर्त ट्रेडिंग विषयी बाबतची महत्वाची जाणून घेऊयात…
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय ???
हे लक्षात घ्या कि, या वर्षीच्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सेशन (Muhurat Trading 2022) मध्ये दिवाळीपासून हिंदू कॅलेंडर वर्षानुसार संवत 2079 ची सुरुवात होईल. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये ट्रेड केल्याने वर्षभर समृद्धी आणि संपत्ती येते, असे मानले जाते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील अनेक ट्रेडर्स स्पेशल शेअर ट्रेडिंग करतात. म्हणूनच याला मुहूर्त ट्रेडिंग असेही म्हंटले जाते.
मुहूर्त ट्रेडिंगसाठीची वेळ 2022 (Muhurat Trading 2022)
ब्लॉक डील सेशन – संध्याकाळी 5.45 ते 6.00 पर्यंत
प्री ओपन ट्रेडिंग सेशन – संध्याकाळी 6.00 ते 6.08 पर्यंत
नॉर्मल मार्केट – संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत
कॉल ऑक्शन सेशन – संध्याकाळी 6.20 ते 7.05 पर्यंत
क्लोजिंग सेशन – संध्याकाळी 7.15 ते 7.25 पर्यंत
या दिवशी ट्रेडिंग का केले जाते ???
हे लक्षात घ्या कि, मुहूर्त ट्रेडिंगच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या एक तासाच्या मुहूर्तावर बहुतांश गुंतवणूकदारांकडून शेअर्सची खरेदी केली जाते. या मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. दरवर्षी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी (Muhurat Trading 2022) एक विशिष्ट वेळ निश्चित केली जाते. या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांकडून व्हॅल्यू बेस्ड शेअर्सची खरेदी केली जाते.
‘या’ शेअर्समध्ये गुंतवता येतील पैसे
बाजारातील सध्याची परिस्थितीनुसार ब्रोकरेज फर्म निर्मल बंग इन्स्टिट्यूशनल इक्विटीज रिसर्चकडून अशा 12 शेअर्सची लिस्ट केली आहे जे पुढील दिवाळीपर्यंत गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देऊ शकतील. लार्ज कॅप स्पेसमधून, ब्रोकरेजने ब्रिटानिया इंडस्ट्रीज (टार्गेट प्राईस: 4,600 रुपये), सिप्ला (1,268 रुपये), हिरो मोटोकॉर्प (3,161 रुपये), ICICI बँक (1,079 रुपये) आणि अल्ट्राटेक सिमेंट (8,581 रुपये) सारख्या शेअर्सची शिफारस केली गेली आहे. व्यापक बाजूने, निर्मल बंग सिक्युरिटीजचे विश्लेषक अजंता फार्मा (टार्गेट प्राईस : 1,491 रुपये), बाटा इंडिया (2,240 रुपये), सीसीएल उत्पादने (700 रुपये), फेडरल बँक (149 रुपये), जेके लक्ष्मी सिमेंट्स (786 रुपये), आयनॉक्स लीसिस (720 रुपये) आणि ला ओपाला आरजी (500 रुपये) ला सकारात्मक मत दिले आहे. Muhurat Trading 2022
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www1.nseindia.com/content/circulars/FAOP50561.pdf
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त