हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंप, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, नॅचरल गॅस यांनतर भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आता सलून बिसिनेस मध्ये उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स चेन्नईस्थित नॅचरल्स सलून अँड स्पामधील सुमारे 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. रिलायन्स रिटेल 49 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते आणि संयुक्त उपक्रम तयार करू शकते.
नॅचरल्स सलून अँड स्पाचे भारतात सुमारे 700 आउटलेट आहेत आणि रिलायन्सला हे अजून ४-५ पट वाढवायचे आहे. सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. Groom India Salon & Spa ही कंपनी Natural Salon & Spa चालवते. कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या लॅक्मे ब्रँड आणि एनरिचसह प्रादेशिक ब्रँडशी स्पर्धा करते.
भारतात सलून आणि स्पा उद्योग सुमारे 20,000 कोटींचा आहे, आणि दशेतील जवळपास 65 लाख लोक सध्या या उद्योगाशी निगडीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतर या सलून उद्योगावर देखील खूप परिणाम झाला होता. पण त्यानंतर हळूहळू या व्यवसायालाही गती मिळत असून भविष्यात सलून व्यवसायाचा मोठा विस्तार होण्याची शक्यता आहे.