मुकेश अंबानी ‘या’ राज्यात उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी भारतात करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी गुजरातमध्ये हे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. या ठिकाणी त्यांचा समूहमार्फत तेल शुद्धीकरणाचा मोठा प्रकल्पही सुरू आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रिलायन्सच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाची किंमत आणि अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. माहितीनुसार हे प्राणी संग्रहालय २०२३ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

अंबानी यांची नेट वर्थ ८० अब्ज डॉलर्स इतकं आहे. यामध्ये त्यांचा टेक पासून ई-कॉमर्समधील व्यवसायाचा समावेश आहे. तर दुसरीकडे ते आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स या संघाचेही मालक आहेत. त्यांनी आपलं लक्ष हे सार्वजनिक व्हेंचर्सवरही वाढवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’