Monday, January 30, 2023

तेव्हाच आमच्याशी “लव्ह मॅरेज” केलं असतं तर आज युतीची सत्ता राहिली असती ; गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहो राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी लगेच ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं तर आज राज्यात सरकार राहिलं असतं, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजने अंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाउसच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार गिरीश महाजन शनिवारी एकाच व्यासपीठावर होते.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेत कशी सत्ता आणली, हे मला चांगले माहिती आहे. त्यांनी जी रसद पुरवून सत्ता आणली ती रसद आमच्याकडे नव्हती.

- Advertisement -

त्यांनी राज्यात जे केले, तेच महापालिकेतही केले. तेव्हा जर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते. तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती. पण ते आपल्या हातात नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’