हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या Mukesh Ambani यांना आता ‘अदानी ग्रुप’ चे मालक गौतम अदानी यांनी त्यांना मागे टाकले आहे. आता ते भारत आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मात्र असे असूनही मुकेश अंबानी अनेक बड्या अब्जाधीशांना मागे टाकत जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत 8 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Mukesh Ambani हे आपल्या आलिशान लाइफ़स्टाइलसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. विशेषतः मुंबईतील अल्टामाउंट रोड (पेडर रोड) वर असलेले त्यांचे 26 मजली ‘अँटिलिया’ हे घर सतत चर्चेचा विषय ठरत असते. या ‘अँटिलिया’ ची किंमत ही जवळपास 15,000 कोटींच्या घरात आहे.
Mukesh Ambani हे दक्षिण मुंबईतील सर्वात हाय-प्रोफाइल भागांपैकी एक असलेल्या अल्टामाऊंट रोडवरील ‘अँटिलिया’मध्ये राहतात. हा भारतातील सर्वात महागडा रोड आहे तर जगातील 10 वा सर्वात महागडा रोड आहे. या भागात घर खरेदी करणे म्हणजे दिवा स्वप्न पाहण्यासारखेच आहे. भरपूर पैसे असलेली लोकंच या भागात घर खरेदी करू शकतात. आता आपल्या मनात असा प्रश्न उभा राहिला असेल की मुकेश अंबानींचे शेजारी कोण असतील??? चला तर मग Mukesh Ambani च्या शेजाऱ्यां विषयीची माहिती जाणून घेऊया-
1- JSW ग्रुपचे प्रशांत जैन
भारतातील प्रसिद्ध बिझनेस हाऊसपैकी एक असलेल्या ‘सज्जन जिंदाल ग्रुप’ची कंपनी JSW एनर्जीचे सीईओ असलेलं प्रशांत जैन हे देखील ’33 साउथ’ टॉवरमध्ये राहतात. त्यांनी गेल्याच वर्षी या भागात 45 कोटी रुपयांचे एक डुप्लेक्स घर घेतले.
2-टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन
टाटा ग्रुपची कंपनी ‘टाटा सन्स’ चे चेअरमन असलेले एन चंद्रशेखरन देखील पेडर रोडवरील ’33 साउथ’ लक्झरी टॉवरमध्ये राहतात. गेल्या 5 वर्षांपासून त्यांचे कुटुंब येथे भाड्याने राहत होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी या टॉवरच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावरील डुप्लेक्स विकत घेतले. ज्याची किंमत 98 कोटी रुपये आहे.
3- मोतीलाल ओसवाल
देशातील प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक असलेले ‘ओसवाल’ देखील याच भागात राहतात. मोतीलाल ओसवाल ट्रस्टने 2020 मध्ये ’33 साऊथ’ च्या 13व्या आणि 17व्या मजल्यावरील डुप्लेक्स घरे विकत घेतली आहेत. त्यांनी 1.48 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने ही घरे खरेदी केली आहेत.
4- Dream11 चे सह-संस्थापक
फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म Dream11 चे सह-संस्थापक असलेले हर्ष जैन यांच्या पत्नी रचना जैन यांनी गेल्याच वर्षी ’33 साउथ’ या टॉवरमध्ये एक लक्झरी डुप्लेक्स घर विकत घेतले होते. या डुप्लेक्ससाठी त्यांना 72 कोटी रुपये मोजावे लागले.
5- ‘Yes Bank’ चे संस्थापक राणा कपूर
2013 मध्ये ‘Yes Bank’ चे संस्थापक असलेल्या राणा कपूर यांनी या भागात 128 कोटी रुपयांना हाऊसिंग कॉम्प्लेक्स खरेदी केले होते. या अपार्टमेंटचे नाव खुर्शीदाबाद बिल्डिंग असे आहे. या ब्लॉकमध्ये एकूण 6 अपार्टमेंट आहेत. ज्याची किंमत 150 कोटींहून जास्त आहे.
‘हे’ सेलिब्रेटी देखील पेडर रोडवर राहतात
मुंबईच्या या हाय-प्रोफाइल भागात अनेक प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींची देखील घरे आहेत. त्यापैकी पहिले नाव हे ‘भारतरत्न’ लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे येते. याशिवाय प्रसिद्ध अभिनेते गुरु दत्त यांचेही घर येथे होते. दिवंगत संगीत दिग्दर्शक मदन मोहन आणि माजी भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचेही घर पेडर रोडवर होते. Mukesh Ambani
याशिवाय मुंबईच्या अल्टामाऊंट रोडवर लोढा अल्टामाऊंट, द इम्पीरियल, ट्विन-टॉवर आणि स्कायस्क्रॅपर कॉम्प्लेक्स देखील आहेत. ज्यामध्ये देशातील अनेक प्रसिद्ध उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची लक्झरी घरे आहेत. Mukesh Ambani
मुकेश अंबानींच्या घराविषयीच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
http://Source: https://housing.com/news/mukesh-ambani-house-antilia/
हे पण वाचा :
Cardless Cash Withdrawl : आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा
चाणक्य नीति काय सांगते… शत्रूवर विजय मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
अरे बापरे!! ‘या’ गावातील लोकं महिनोंमहिने झोपतात; काय आहे गुपित? जाणून घ्या…