हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले Mukesh Ambani यांनी $82 अब्ज संपत्तीसहीत जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये आपले कायम राखले आहेत. नुकतेच 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्या संपत्तीत यंदा 20 टक्के किंवा $21 अब्जची घटही झाली आहे.
इथे हे लक्षात घ्या कि, सलग तिसऱ्या वर्षी Mukesh Ambani यांनी आशियातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान मिळवला आहे. आपल्या संपत्तीत 35 टक्के किंवा $28 अब्जची घट झाल्याने 53 अब्ज डॉलरसहीत अदानी ग्रुपचे गौतम अदानी या लिस्ट गेल्या वर्षीच्या दुसऱ्या क्रमांकावरून 23 व्या स्थानावर घसरले आहेत. जानेवारीमध्ये अमेरिकन शॉर्ट-सेलर असलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी यांच्या संपत्तीत 60 टक्क्यांहून अधिकची घट झाल्याचे दिसून आले आहे.
जगातील अव्वल 50 श्रीमंत लोकांमध्ये सायरस पूनावाला (जागतिक रँक 46, संपत्ती $27 अब्ज) आणि शिव नाडर (जागतिक रँक 50, $26 अब्ज) या भारतीय अब्जाधीशांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे, पूनावाला वगळता जागतिक अव्वल 100 श्रीमंतांमधील इतर सर्व भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
यूएस आणि चीनसारख्या देशांमध्ये अनुक्रमे 178 आणि 123 अब्जाधीश आहेत, ज्यांनी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती गमावली. तर 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतातील असे 41 अब्जाधीश आहेत ज्यांनी 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती गमावली आहे. तसेच गेल्या वर्षभरात 1 अब्ज डॉलर्स किंवा त्याहून जास्त रकमेची भर पडलेल्या अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. Mukesh Ambani
हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारताच्या 16 अब्जाधीशांचे नाव जोडले गेले आहे. ज्यामध्ये भारतने तिसरे स्थान पटकावले आहे. तर यावर्षीच्या लिस्टमध्ये इटलीच्या 9 अब्जाधीशांचा समावेश झाला आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये, 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतीय अब्जाधीशांनी त्यांच्या एकत्रित संपत्तीमध्ये जवळपास ₹360 अब्जांची भर घातली, जी हाँगकाँगच्या GDP इतकी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत नवीन प्रवेशिका, रेखा राकेश झुनझुनवाला या 2023 च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये अव्व्ल 16 नवीन भारतीय प्रवेशकर्त्यांच्या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. Mukesh Ambani
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hurunindia.net/m3m-hurun-global-rich-list-2022
हे पण वाचा :
गेल्या 15 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने दिला कोट्यवधींचा नफा
IRCTC App द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या
10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम
FD Rates : ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवण्याची शेवटची संधी !!!
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम