हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर गेल्या काही वर्षांत मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात अशा काही कंपन्या देखील लिस्टेड आहेत ज्या घसरणीनंतर चांगला रिटर्न देत आहेत. यामध्ये फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या IPCA Lab चा देखील समावेष आहे. दीर्घकालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. या शेअर्समध्ये अवघ्या 12,000 रुपयांची गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.
मात्र सोमवार, 2 जानेवारी रोजी इप्का लॅबचे शेअर्स एका वर्षाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले आहेत. तसेच, 4 जानेवारीला कमकुवत बाजारातही यामध्ये सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. बीएसईवर इंट्रा-डेमध्ये या शेअर्सनी 860 रुपयांची पातळी गाठली होती. दिवसअखेर तो 854.10 रुपयांवर बंद झाला. इप्का लॅबची मार्केट कॅप 21,664.86 कोटी रुपये इतकी आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
7 डिसेंबर 2001 रोजी म्हणजेच सुमारे 20 वर्षांपूर्वी IPCA लॅबच्या शेअर्सची प्रभावी किंमत फक्त 4.50 रुपये होती. मात्र आज त्याची किंमत 850 पटीने वाढून 854.10 रुपये झाली आहे. या कालावधीमध्ये फक्त 12,000 रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदारांना आज एक कोटी रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
एका वर्षात झाली मजबूत वाढ
हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून आला आहे. गेल्या वर्षी 10 जानेवारी 2022 रोजी तो 1124.40 रुपयांच्या एका वर्षातील विक्रमी उच्चांकावर होता, मात्र 2 जानेवारी 2023 पर्यंत तो 26 टक्क्यांनी घसरून 830 रुपयांवर आला आहे. यानंतर त्यामध्ये पुन्हा तीन टक्के वसुली झाली आहे. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
IPCA Lab हा वेदना, अँटीमलेरिया आणि हेअर केअर थेरपीमधील एक अग्रगण्य ब्रँड आहे. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, IPCA Lab विविध रोगांसाठी 350 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन आणि 80 API तयार करते. 120 हून जास्त देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय पसरलेला आहे. यामध्ये जगभरात 15 API प्लांट आणि 11 फॉर्म्युलेशन प्लांट आहेत. IQVIA मे 2020 नुसार भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधील टॉप 300 ब्रँड्समध्ये तिचे चार फॉर्म्युलेशन आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/ipca-laboratories-ltd/ipcalab/524494/
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा