‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजाराविषयी योग्य अंदाज लावणे जरा अवघडच आहे. यामध्ये कधी कोणता शेअर गुंतवणूकदारांना मालामाल बनवेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र मार्केटमधील एक्सपर्ट्सच्या मते, जर हुशारीने गुंतवणूक केली यामधून भरपूर पैसे कमवता येतात. अशातच दिग्गज गुंतवणूकदार मनीष गोयल यांनी आपले मत व्यक्त करताना म्हंटले कि, शेअर बाजारातील स्मॉल-कॅप शेअर्स आणि मिड-कॅप शेअर्समध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणुक करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. सूर्यलथा स्पिनिंग मिल्स लिमिटेडचे ​​शेअर्सदेखील त्यांपैकीच एक आहेत. या शेअर्सची गेल्या एका महिन्याच्या कालावधीत मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे.

This multibagger delivered over 300% return in one year; more upside likely  - BusinessToday

अवघ्या एका महिन्यात या शेअर्सची किंमत सुमारे 300 रुपयांवरून 620 रुपयांपर्यंत वाढली आहे. या शेअर्सने एका महिन्याच्या कालावधीत आपल्या भागधारकांना 100 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. मात्र, मनीष गोयल यांना वाटते की, गेल्या एका महिन्यात भागधारकांना दुप्पट नफा देऊनही बीएसई लिस्टेड असलेल्या या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये आणखी नफा देण्याची आहे. Multibagger Stock

Multibagger Stock This share of Dolly Khanna gave a return of 328 percent  in one year share price increased 4 times Pi News | PRO IQRA NEWS

होऊ शकेल मोठी वाढ

(बेंजामिन) ग्रॅहमच्या सूत्रानुसार, सूर्यलथा स्पिनिंग मिल्सच्या शेअर्सची वाजवी किंमत प्रति शेअर 1,167 रुपयांपर्यंत जाऊ शकते. आज सूर्यलथा स्पिनिंग मिल्सच्या शेअर्सची किंमत 620 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच बेंजामिन ग्रॅहमच्या सूत्रानुसार, या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होण्याची क्षमता आहे, असे मत मनीष गोयल यांनी व्यक्त केले आहे. Multibagger Stock

Multibagger stock turns 35 paise to Rs 209.85, delivers 59,857% return in  less than 6 months | Markets News | Zee News

तज्ञांनी होल्ड करण्यास सांगितले

या शेअर्सबाबत होल्ड करण्याचा सल्ला देताना, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी सांगितले कि, “गेल्या 15 सत्रांपासून हे शेअर्स तेजीत आहे. ज्यामुळे यामध्ये ₹570 स्टॉप लॉसवर तो खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Multibagger Stock

BSE वर लिस्टेड असलेल्या या कंपनीच्या शेअर्सची सध्याची मार्केटकॅप अंदाजे ₹264 कोटी आहे. गेल्या काही सत्रांमध्ये या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये तेजी नोंदवली आहे. याचा गेल्या 52-आठवड्यांचा उच्चांक ₹635 प्रति शेअर तर गेल्या 52-आठवड्यांचा निच्चांक ₹272.40 प्रति शेअर आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://www.bseindia.com/stock-share-price/suryalata-spinning-mills-ltd/suryala/514138

हे पण वाचा :
UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती
BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन, 455 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डाटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, पहा आजचे नवीन भाव
Kotak Mahindra Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदर 50 Bps ने वाढवले
आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे