हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. दीर्घ कालावधीमध्ये या कंपन्यांच्या शेअर्सची त्यांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या लिस्टमध्ये बिस्किटे बनवणाऱ्या ब्रिटानिया कंपनीच्या शेअर्सचेही नाव सामील आहे. ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केली ते आज चांगलेच मालामाल झाले आहेत. गेल्या 26 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.47 रुपयांवरून 4,237 रुपयांपर्यंत वाढली आहे.
सप्टेंबर 2022 तिमाहीच्या उत्कृष्ट निकालानंतर या शेअर्सने जोरदार उडी घेत विक्रमी उच्चांक बनवला आहे. यावेळी कंपनीचा बाजारातील हिस्सा देखील 15 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. निकालानंतर दुसऱ्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्समध्ये खरेदीही वाढली आणि सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी या शेअर्सने 10 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. आज, या शेअर्समध्ये इंट्राडेमध्ये थोडीशी घसरण झाली आहे आणि तो NSE वर 0.86 टक्क्यांनी घसरून 4,099.55 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. Multibagger Stock
कंपनीच्या व्यवसायात सलग 38 तिमाहीत वाढ
हे लक्षात घ्या कि, सलग 38 तिमाहीत FMCG सेक्टर मधील मोठी कंपनी असलेल्या ब्रिटानियाच्या व्यवसायात वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये एकत्रित निव्वळ नफ्यामध्ये वार्षिकरित्या 28 टक्क्यांची वाढ झाली. तसेच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीला 490 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा मिळाला आहे. विश्लेषकांनी 451 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज वर्तवला होता, मात्र तो त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त होता. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना झाले मालामाल
दीर्घ कालावधीमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. गेल्या 26 वर्षात ब्रिटानियाच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 31355 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 5 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 72 टक्के रिटर्न दिला आहे. त्याच बरोबर गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये जवळपास 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे हा स्टॉक 6 महिन्यांत 28 टक्क्यांनी वाढला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदारांनी केली कोट्यवधी रुपयांची कमाई
ब्रिटानियाचे शेअर्स 22 मार्च 1996 रोजी 13.47 रुपयांच्या किंमतीत होते. नोव्हेंबर 2022 मध्ये तो 4,237 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जर एखाद्याने या शेअर्समध्ये 26 वर्षांपूर्वी फक्त 33 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 10,380,178 रुपये झाले असते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=BRITANNIA
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा