हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अजंता फार्माच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच येत्या काळातही अजंता फार्माचे शेअर्स आणखी उसळी घेण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. हे जाणून घ्या कि, हे शेअर्स बुधवारी 1.11 टक्क्यांनी घसरून 1,191 रुपयांवर बंद झाले आहेत. गेल्या 12 वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत.
12 ते 1200 रुपयांपर्यंतचा पल्ला
29 जानेवारी 2010 रोजी 12.14 रुपये किंमत असलेल्या अजंता फार्माच्या शेअर्सची किंमत 1200 रुपयांच्या पातळीवर आहे. तसेच या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक 1427.50 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा नीचांक 1061.77 रुपये आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअर्समध्ये 3.97 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच गेल्या एका महिन्यात यामध्ये 2.10 टक्के तर गेल्या सहा महिन्यांत 8.52 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Multibagger Stock
10 हजार टक्क्यांनी घेतली झेप
29 जानेवारी 2010 पासून आतापर्यन्त या शेअर्समध्ये 100 पट वाढ झाल्याचे दिसून येते आहे. गेल्या 13 वर्षात या शेअर्सने 10 हजार टक्क्यांनी झेप घेतली. जर एखाद्याने यावेळी अजंता फार्माच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 कोटी रुपये मिळाले असते. Multibagger Stock
इथून लागली गळती
11 मे 2022 रोजी या शेअर्सने गेल्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1062.73 रुपये गाठली. यानंतर, पुढील चार महिन्यांत या शेअर्सने 34 टक्क्यांनी झेप घेतली. तसेच 9 सप्टेंबर 2022 रोजी तो 1425.80 च्या पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर अजंता फार्माच्या शेअर्सच्या घसरणीचा टप्पा सुरू झाला. मात्र, येत्या काही दिवसांत हे शेअर्स सध्याच्या पातळीपासून 16 टक्क्यांपर्यंत रिकव्हर होऊ शकतो, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्याची मार्केटकॅप 15,512.75 कोटी रुपये आहे. Multibagger Stock
नफा वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न
येत्या 2-3 वर्षात कंपनी नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच कंपनीने भारतासहीत आशिया आणि आफ्रिकेमध्ये ब्रँडेड जेनेरिकच्या दृष्टीने आपला व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहे. मात्र, यूएस मंजुरी मिळवण्यात उशीर झाल्यामुळे अल्पावधीतच जेनेरिकची वाढ मंदावू शकते. मात्र येत्या काही दिवसांत अजंता फार्माचा शेअर 16 टक्क्यांपर्यंत झेप घेऊ शकतो, असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज फर्मला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.bseindia.com/stock-share-price/ajanta-pharma-ltd/ajantpharm/532331/
हे पण वाचा :
10 हजारांपेक्षा कमी किंमत असलेला Realme C33 भारतात लाँच, असे असतील फीचर्स
एकापेक्षा जास्त PF Account असतील तर अशा प्रकारे करा विलीन अन्यथा होऊ शकेल त्रास
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमधून सोनीचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Bank Loan : अल्प मुदतीचे कर्ज घेण्याआधी त्यामधील ‘या’ 3 धोक्यांविषयीची माहिती जाणून घ्या