गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 400% पेक्षा जास्त रिटर्न

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी गुंतवणुकीत अनेक पट रिटर्न दिला आहे. सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहेत. या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. आता ही कंपनी लवकरच स्टॉक स्प्लिट देखील करणार आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

हे लक्षात घ्या कि, या कंपनीच्या संचालक मंडळाकडून नुकतेच 1:5 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यास मान्यता मिळाली आहे. शेअर बाजाराला आपल्या माहितीत कंपनीने सांगितले की, कंपनीच्या बोर्डाने 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या एका इक्विटी शेअरच्या स्टॉक स्प्लिटला 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूमध्ये स्प्लिट करण्यात मान्यता दिली आहे.

IPO पासून शेअर्सने दिला जबरदस्त रिटर्न

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेडने शेअर बाजाराला सांगितले की,” 7 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या बोर्डाने स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये 10 रुपये प्रति (पूर्ण पेड-अप) फेस व्हॅल्यूचा एक इक्विटी शेअर रुपये 2 प्रति (पूर्ण पेड-अप) च्या फेस व्हॅल्यूच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये स्प्लिट केला जाईल.” Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

हे लक्षात घ्या कि, 2017 रोजी हा NSE SME स्टॉक 31 रुपये प्रति शेअर वर लिस्ट झाला होता. मात्र आज हा मल्टीबॅगर SME स्टॉक 162 रुपये प्रति इक्विटी शेअर वर ट्रेड करत आहे. जो त्याच्या IPO किंमतीच्या जवळपास 5 पट आहे. अशा प्रकारे SME शेअर्सने IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त रिटर्न दिला आहे.

हे शेअर्स NSE SME एक्सचेंजमध्ये समतुल्यपणे लिस्टिंग करण्यात आले होते. मात्र लिस्टिंगनंतर, या शेअर्सने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. शेअर्सचे वाटप केल्यानंतर आजपर्यंत एखाद्या IPO गुंतवणूकदाराने या SME स्टॉकमध्ये ₹1.24 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे ₹6.34 लाख झाले असते. या गेल्या पाच वर्षांत IPO गुंतवणूकदारांना 400% पेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stock

Whether there is a job or not you can get pension know how to get it |  National Pension Scheme: जॉब हो या न हो आपको मिल सकती है पेंशन, जानें कैसे

कंपनी बाबत जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, ही स्मॉल-कॅप कंपनी गेल्या महिन्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कडून मिळालेल्या ₹46.2 कोटींच्या ऑर्डरमुळे चर्चेत आली होती. या कंपनीला BPCL द्वारे पुढील चार महिन्यांत देशभरातील अनेक ठिकाणी डीसी फास्ट ईव्ही चार्जर्सच्या 800 युनिट्सचा पुरवठा आणि इंस्टॉलेशनसाठी एक मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=SERVOTECH

हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदी महागले, आजची किंमत तपासा
Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ
7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या