हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : अलीकडील काळात भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. Fineotex Chemical कंपनीचे शेअर्स देखील याच कॅटेगिरी येतात. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये गणना होणाऱ्या आशिष कचोलिया यांचा हा आवडता स्टॉक आहे. हे जाणून घ्या कि, Fineotex Chemical च्या शेअर्सची सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आपला गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. गुरुवारी NSE वर या कंपनीच्या शेअर्सने 11 टक्क्यांनी उडी घेतली आहे. Multibagger Stock
एका महिन्यात 21% रिटर्न
Fineotex Chemical हा भारतीय शेअर बाजाराने अलीकडच्या काही वर्षांत दिलेल्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. या शेअरने आपल्या भागधारकांना अनेक वेळा चांगला रिटर्न दिला आहे. गेल्या एक महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 193 रुपयांवरून 229.75 रुपयांच्या पातळीवर गेली आहे. एका महिन्यात कंपनीच्या या शेअर्सने गुंतवणूकदारांना 21% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गेल्या 5 वर्षात 700% वाढ
गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 170 रुपयांवरून 229.75 रुपयांवर पोहोचला असून, या कालावधीत त्यामध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 105 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 5 वर्षांत या शेअर्सची किंमत 30 वरून 230 रुपयांपर्यंत वाढली आहे. Multibagger Stock
आशिष कचोलिया यांचे शेअरहोल्डिंग
एप्रिल ते जून 2022 या तिमाहीसाठी Fineotex Chemical च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत आशिष कचोलिया यांच्याकडे Fineotex Chemical चे एकूण 21,42,534 शेअर्स होते म्हणजेच त्यांचे कंपनीत 1.93 टक्के शेअर्स आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत आशिष कचोलिया कडे फक्त 1.84 टक्के हिस्सा होता. अशाप्रकारे कचोलियाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आपला हिस्सा वाढवला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://fineotex.com/
हे पण वाचा :
Bank of Maharashtra च्या ग्राहकांना आता स्वस्त दरात मिळणार कर्ज !!!
QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या
Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या
Home Loan वर किती टॉप अप लोन मिळवता येईल ??? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या