हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सध्या शेअर बाजारात जोरदार विक्री होत आहे. यामुळे चांगले फंडामेंटल्स असलेल्या अनेक शेअर्स मध्येही घसरण झाली आहे. मात्र असे असूनही अदानी पॉवरने आपल्या भागधारकांना जोरदार नफा मिळवून दिला आहे. एकेकाळी (24 मे 2017) 28 रुपये किंमत असलेला हा शेअर 870 टक्क्यांनी वाढून 259.5 रुपयांवर पोहोचला आहे.
अदानीच्या या शेअरने या कालावधीत 55 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. याचा आतापर्यंतचा उच्चांक हा 344.5 रुपये आहे. अदानी ग्रुपच्या इतर काही शेअर्सप्रमाणेच, अदानी पॉवरच्या शेअर्समध्येही 2022 च्या सुरुवातीपासून जोरदार वाढ होते आहे. NSE वर गेल्या महिन्यात हा शेअर 344.5 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर गेला होता. Multibagger Stock
या वर्षी अदानी पॉवरच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 155 टक्के जोरदार रिटर्न दिला आहे. तर, गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत त्याने सुमारे 115 टक्के रिटर्न दिला आहे. यावेळी त्याची किंमत 120 रुपयांवरून 259.5 रुपयांपर्यंत आली आहे. तसेच गेल्या 2 वर्षांत शेअरने सुमारे 38 ते 259.5 रुपयांची पातळीगाठून सुमारे 580 टक्के रिटर्न दिला. Multibagger Stock
त्याच बरोबर जर गेल्या 4 वर्षांबाबत बोलायचे झाल्यास हा शेअर 18.5 रुपयांच्या पातळीवरून 259.5 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत या शेअर्समध्ये सुमारे 1300 टक्क्यांनी वाढ झली आहे. मात्र, हे लक्षात घ्या कि, गेल्या दोन आठवड्यांपासून हा शेअर प्रॉफिट बुकींगच्या टप्प्यातून जात आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanipower.com/
हे पण वाचा :
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!
EPFO मध्ये नॉमिनेशन करणे बंधनकारक, त्यासाठीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या
Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला लाखोंचा नफा !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा
LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या