Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock  : असे म्हणतात कि शेअर मार्केटमध्ये जो संयम दाखवतो तो भरपूर पैसे कमावतो. इथे शेअर्सच्या सततच्या खरेदी-विक्रीतून जितके पैसे मिळत नाहीत तितके पैसे वाट पाहून मिळतात. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. Tata Elxsi शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे.

Tata Elxsi Q3 results: Net profit up 39.5% at Rs 105 cr - The Economic Times

Tata Elxsi च्या शेअर्समध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती ते आज मालामाल झाले आहेत. या शेअरमध्ये गुंतवलेले पैसे आतापर्यंत 78 पटीने वाढले आहेत. गेल्या 10 वर्षात या IT शेअर्सची किंमत 104.33 रुपयांवरून 8159 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, हे लक्षात घ्या गुरुवारी हा शेअर खाली आला आहे. Multibagger Stock

This metal stock gives multibagger return of over 160% in 3 months | Mint

टाटा ग्रुपच्या या शेअरने गेल्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 33.63 टक्के रिटर्न दिला आहे. 2022 मध्ये तर यामध्ये आतापर्यंत जवळपास 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या वर्षभरात यामध्ये 109 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षांत या शेअरमधून गुंतवणूकदारांना 955 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच ज्या गुंतवणूकदारांनी दहा वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 7750% रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stock

Invest Now and Make Money in the Stock Market!

जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे 2.15 लाख रुपये झाले असतील. तसेच पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्याला 10.55 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी एक लाख रुपये टाकणाऱ्याला आता 78.50 लाख रुपये मिळतील. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tataelxsi.com/

हे पण वाचा :

Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा

SBI चे होम लोन महागले, बँकेकडून ​​किमान व्याजदरात वाढ !!!

Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या !!!

Recharge Plans : एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स तपासा