Multibagger Stock : चॉकलेट बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे केले तिप्पट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात भारतीय शेअर बाजारात अनेक चढ- उतार दिसून येत आहेत. यावेळी कधी कोणता शेअर वर जाईल कधी कोणता शेअर खाली येईल हे कळतच नाही. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी अगदी कमी कालावधीत गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशांचा पाऊसच पाडला आहे. Lotus Chocolate या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहेत. गेल्या महिन्याभरात तर ते खूपच तेजीत आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून यामध्ये सतत अप्पर सर्किट दिसून येत आहे. शुक्रवारी देखील हे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीने 309.90 रुपयांवर बंद झाले. जो या शेअर्सचा हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. कंपनीची मार्केट कॅप 379 कोटी रुपये आहे. या मल्टीबॅगर स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीच्चांक 81.90 रुपये आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेडने या कंपनीच्या शेअर्समध्ये भागभांडवल खरेदी केल्यामुळे यामध्ये वाढ झाली आहे. या दोन कंपन्यांनी Lotus Chocolate मध्ये केलेल्या गुंतवणुकीची बातमी बाहेर आल्यापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदार देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. Multibagger Stock

Small and midcaps throng multibagger list of stocks in 2021

मल्टीबॅगर रिटर्न

हे जाणून घ्या कि, Lotus Chocolate चे शेअर्स दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांना भरपूर रिटर्न देत आहेत. गेल्या पाच वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा दिला आहे. 2 फेब्रुवारी 2018 रोजी 49.15 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 295.15 रुपयांच्या पातळीवर आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 134 टक्के तर गेल्या 6 महिन्यांत 163 टक्के त्याचप्रमाणे गेल्या एका महिन्यात 177 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine  trade sessions | Zee Business

गुंतवणूकदार झाले मालामाल

जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी Lotus Chocolate च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे 600,508 रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने महिन्यापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याचे 277,788 रुपये झाले असतील. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.bseindia.com/stock-share-price/lotus-chocolate-coltd/lotuscho/523475/

हे पण वाचा :
Cafe Coffee Day वर सेबी कडून मोठी कारवाई, ठोठावला 26 कोटींचा दंड
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने एफडीचे दर वाढवले, ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याज मिळवण्याची संधी
LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Jio कडून कमी किंमतीत भरपूर डेटा देणारे 2 रिचार्ज प्लॅन लॉन्च, जाणून घ्या या प्लॅनचे अतिरिक्त फायदे