हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजाराने अनेक मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत. आयशर मोटर्सचे शेअर्स देखील याच श्रेणीमध्ये गणले जातात. गेल्या 20 वर्षात या शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून दिली आहे. 20 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 7.50 रुपये किंमत असलेल्या या शेअर्सची किंमत गुरुवारी 3179.90 रुपयांवर आहे. अशा प्रकारे, या कालावधीत या शेअर्समध्ये तब्ब्ल 420 पट वाढ झाली आहे.
आयशर मोटर्सच्या या शेअर्सद्वारे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की जे गुंतवणूकदार संयम बाळगतात तेच शेअर बाजारातून मोठा नफा कमवू शकतात. तसेच जे गुंतवणूकदार मजबूत व्यवसाय मॉडेल असलेल्या आणि मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या कंपनीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात, त्यांना बाजार कधीच निराश करत नाही आणि त्यांना जोरदार रिटर्न मिळतो. Multibagger Stock
आयशर मोटर्सचे शेअर्स आजही 0.79 टक्क्यांनी वर आहे आणि तो 3179.90 वर ट्रेड करत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हे शेअर्स 1.22 टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या एका महिन्याबाबत बोलायचे झाल्यास ते 4.37 टक्क्यांनी वाढले आहेत. तर 2022 या वर्षामध्ये, या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 17 टक्के रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे एका वर्षात 16.98 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गेल्या दहा वर्षांत हा शेअर 1,425 टक्क्यांनी वाढला असून तो 206 रुपयांवरून 3179.90 रुपयांवर गेला आहे. गेल्या 20 वर्षांत, या शेअर्सने गुंतवणूकदारांना 41,900 टक्के रिटर्न दिला आहे. NSE वर तो 7.50 रुपयांवरून 3179.90 रुपयांपर्यंत आला आहे. Multibagger Stock
जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी आयशर मोटर्सच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 1.21 लाख रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे जर एखाद्याने दहा वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आज 15.25 लाख रुपये मिळाले असतील. तसेच 20 वर्षांपूर्वी जर एखाद्याने या शेअर्समध्ये एक लाख गुंतवले असतील तर आज त्याला 4.20 कोटी मिळाले असतील. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.eicher.in/
हे पण वाचा :
Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!
EPFO: जर नियोक्ता तुमच्या PF खात्यात पैसे टाकत नसेल तर काय करावे ???
RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!
Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा