हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : 2022 या आर्थिक वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये अनेकदा अनिश्चितता पाहायला मिळाली. चढ-उतारांनी भरलेल्या या वर्षात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. Hemang Resources या कंपनीचे शेअर्सचा समावेश देखील अशाच मल्टीबॅगर स्टॉक होतो. या शेअर्सने या वर्षी गुंतवणूकदारांना 1920% इतका मोठा रिटर्न दिला आहे. जानेवारी 2002 मध्ये 63 रुपये किंमत असलेले हे शेअर्स सध्या 63 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
हेमांग रिसोर्सेस लिमिटेड चे नाव आधी भाटिया इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे होते. 1993 साली स्थापना झालेली ही एक नॉन बँकिंग फायनान्शिअल इंस्टीट्यूशन आहे. 2015 साली या कंपनीचे नाव बदलून हेमांग रिसोर्सेस लिमिटेड असे करण्यात आले. कोल ट्रेडिंग आणि रिअल इस्टेट सेक्टरमध्ये ही कंपनी सक्रिय आहे. हे आयातित आणि स्वदेशी कोळशाचा व्यापार करते. यासोबतच कंपनीने रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करण्यासाठी प्राइम लोकेशन्सवर जमीनीची खरेदी केली आहे. Multibagger Stock
दिला 21 पट नफा
गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 21 पट नफा दिला आहे. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 21 लाख रुपये झाले असते. गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 17 टक्क्यांनी तर सहा महिन्यांत 23 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,930 टक्के रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षात हेमांग रिसोर्सेसने गुंतवणूकदारांना सुमारे 595 टक्के नफा दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
दीर्घकालावधीमध्ये या मल्टीबॅगर स्टॉकने मोठा नफा निववून दिला आहे. गेल्या 20 वर्षांत या स्टॉकचा रिटर्न 20,238 टक्के आहे. 2002 मध्ये या शेअर्सची किंमत 31 पैसे होती. ती आता 63 रुपये झाली आहे. जर एखाद्याने जुलै 2002 मध्ये याकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 3 कोटी रुपये मिळाले असते. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/hemang-resources-ltd/hemang/531178/
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये