‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 15 वर्षात दिला 18110% रिटर्न !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारामध्ये कंपन्यांचे शेअर्स हे मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. अशा शेअर्स पैकीच एक असलेल्या पेज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 12 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. आज इंट्राडेमध्ये या शेअर्सने 50 हजारांची पातळी ओलांडत 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. तर BSE वर या शेअर्स ने 50,338 रुपयांची पातळी गाठली. जूनच्या तिमाहीतील उत्कृष्ट निकालामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. गेल्या 15 वर्षांत, या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 18110% मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

Interwall Interiors | Jockey, Bangalore

हे जाणून घ्या कि, 1994 मध्ये स्थापना झालेल्या पेज इंडस्ट्रीज लिमिटेडकडे जॉकी आणि स्पीडो सारख्या अंडर गारमेंट्स ब्रँडचा पोर्टफोलिओ आहे. गुरुवारी पेज इंडस्ट्रीजकडून आपले तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. कंपनीने जून तिमाहीत 207 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 10.9 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन रेव्हेन्‍यू 1,341 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या याच तिमाहीच्या तुलनेत हे दुप्पट आहे. Multibagger Stock

This multibagger stock hits upper circuit; zooms over 550% in one year - BusinessToday

आणखी वाढ होईल

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटी म्हणते कि, “मध्यम ते दीर्घकालीन दृष्टीकोनातून, आमचा असा विश्वास आहे की, पेजमध्ये (ऑपरेटिंग) मार्जिन विस्तार क्षमता आहे. पेजचे EBITDA मार्जिन गेल्या 10+ वर्षांमध्ये 18 टक्के आहे. नीरो श्रेणी -21%. ब्रोकरेजने स्टॉकला जाहिरात रेटिंग देताना पेज इंडस्ट्रीजची टार्गेट प्राईस 52,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे.” Multibagger Stock

Best Multibagger Stock: इस शेयर ने 10 साल में किया 14 गुना पैसा, अभी भी मिल रही Buy रेटिंग - Best Multibagger Stock list CCL Products Hyderabad investors become rich axis securities tuts - AajTak

दुसरीकडे, ब्रोकरेज फर्म एक्सिस सिक्युरिटीज म्हणते, “पेजच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश असलेल्या सर्व उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. सर्व पुरवठा साखळी आता पूर्वपदावर आल्या आहेत. यामुळे कंपनीला आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढलेल्या मागणीचा फायदा होईल.” ICICI सिक्युरिटीने पेज इंडस्ट्रीजला Rs 51,900 च्या टार्गेट प्राईससह होल्ड रेटिंग दिली आहे. Multibagger Stock

ICICI Bank ने QIP के तहत शेयर अलॉटमेंट से 15,000 करोड़ रुपये जुटाए, यहां होगा पैसे का इस्तेमाल | Zee Business Hindi

15 वर्षात 18110% रिटर्न

गेल्या एका महिन्यात पेज इंडस्ट्रीजचा हिस्सा 13.51 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा दिला आहे. त्याचप्रमाणे 2022 मध्ये या शेअर्समध्ये 19.48 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात हा शेअर 50 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत, या शेअर्सने गुंतवणूकदारांना 186 टक्के इतका मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 15 वर्षात या शेअर्सने 18110% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pageind.com/

हे पण वाचा :

Har Ghar Tiranga Yojana : टपाल विभागाने वितरित केले 1 कोटींहून जास्त राष्ट्रध्वज !!!

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर पहा

डाळभात महागला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पहा किती झाली वाढ ?

Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे एका वर्षासाठी मिळवा फ्री डेटा !!!

1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट