हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजरात तेच गुंतवणूकदार यश मिळवतात जे संयम बाळगतात. मात्र त्यासाठी योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक करणे देखील फार महत्वाचे आहे. शेअर बाजारात अशा काही कंपन्यादेखील आहेत ज्या फक्त काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून देतात. गेल्या 2 दशकात अशा काही कंपन्या समोर आल्या आहेत ज्यांनी अवघ्या काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
टाईल्स बनवणारी Kajaria Ceramics Limited देखील अशीच एक कंपनी आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये 23 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असेल आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असेल, आज त्यांच्या गुंतवलेल्या पैशाचे मूल्य सुमारे 350 पटीने वाढले आहे. Multibagger Stock
23 वर्षांपूर्वी शेअर्सची किंमत 3.40 रुपये
काल NSE वर Kajaria Ceramics Limited चे शेअर्स 1,191.00 रुपयांवर बंद झाले. मात्र, 23 वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा या शेअर्सने NSE वर पहिल्यांदाच ट्रेड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 3.40 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 23 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 34,930 टक्के इतका मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. Multibagger Stock
1 लाख रुपयांचे केले 4.5 कोटी रुपये
जर एखाद्याने 1 जानेवारी 1999 रोजी Kajaria Ceramics Limited च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य सुमारे साडेचार कोटी रुपये झाले असते. त्याचबरोबर एखाद्याने त्यावेळी फक्त 30 हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तरी आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 5 लाख रुपये झाले असते.Multibagger Stock
मागील 5 वर्षात गुंतवणुकदारांना केले मालामाल
Kajaria Ceramics Limited च्या शेअर्सच्या अलीकडील कामगिरीकडे लक्ष दिले तर, गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 1.08 टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात या शेअर्सची किंमत 4.43 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत, त्याने गुंतवणूकदारांना 64.66 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
Kajaria Ceramics Limited ही भारतातील सिरेमिक आणि विट्रिफाइड टाइल्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. त्याची मार्केटकॅप सुमारे 19.05 हजार कोटी रुपये आहे आणि सध्या त्याचे शेअर्स 44.50 च्या P/E गुणोत्तराने ट्रेड करत आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kajariaceramics.com/
हे पण वाचा :
बाबा रामदेव यांच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 3 वर्षात दिला 4 पट नफा
Hawkins Cookers Ltd कडून आज लॉन्च केली जाणार FD, किती व्याज मिळेल ते तपासा
Penny Stock : फक्त 2 रुपये किंमत असलेल्या ‘या’ शेअर्सने डिव्हीडंड देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
Hawkins Cookers Ltd कडून आज लॉन्च केली जाणार FD, किती व्याज मिळेल ते तपासा
Jio च्या ‘या’ रिचार्जद्वारे अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी