हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यापैकी काही कंपन्यानी अलिकडील काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. सन्मित इन्फ्राचे शेअर्सदेखील त्यापैकीच एक आहे. हे लक्षात घ्या कि, स्मॉल कॅप कंपनी असलेल्या सन्मित इन्फ्राच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळवून दिला आहे. यादरम्यान हे या शेअर्सची किंमत 1.31 रुपयांवरून 78.75 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना तब्ब्ल 5900% रिटर्न मिळाला आहे.
एका महिन्यात दिला 8% रिटर्न
गेल्या एका महिन्यात सन्मित इन्फ्राच्या शेअर्सने 8% रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत 90% रिटर्न दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी 42 रुपये किंमत असलेले हे शेअर्स 76.90 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने 90% रिटर्न दिला आहे. तसेच 2022 मध्ये या शेअर्सने 160% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1.08 लाख रुपये मिळाले असते. तसेच जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.90 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर चार वर्षांपूर्वी एखाद्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आतापर्यंत 5900% रिटर्न मिळाला असता. Multibagger Stock
सन्मित इन्फ्राबाबत जाणून घ्या
स्मॉल कॅप कंपनी असलेल्या सन्मित इन्फ्राची मार्केट कॅप 1240 कोटी रुपये आहे. तसेच या कंपनीच्या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 85.70 रुपये तर गेल्या 52 आठवड्यांचा नीचांक 20.69 रुपये आहे. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.31 रुपयांवरून 78.75 रुपयांपर्यंत वाढली आहे. यादरम्यान कंपनीच्या शेअर्सची गुंतवणूकदारांना 5900% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/sanmit-infra-limited/saninfra/532435
हे पण वाचा :
PIB fact Check : 500 रुपयांची ‘ही’ नोट खरी आहे की बनावट, अशा प्रकारे समजून घ्या
सेकंड हँड Swift खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी
Atal Pension Yojana मध्ये पैसे जमा करता येत नसतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम
Suryoday Small Finance Bank च्या FD वर मिळेल 9% पेक्षा जास्त व्याज
Kotak Mahindra Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा