हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या वर्षीच्या होळीपासून BSE सेन्सेक्सने 14 टक्क्यांनी तर निफ्टी 50 ने 11.65 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक मल्टीबॅगर स्टॉक उदयास आले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनी या वर्षभरातच मोठा नफा मिळवला आहे.
तर आजच्या या बातमीमध्ये आपण अशाच काही 5 मल्टीबॅगर स्टॉक्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 300% पर्यंत रिटर्न दिला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, यादरम्यान शेअर बाजारामध्ये झालेल्या घसरणीचा देखील या शेअर्सवर कोणताही परिणाम झालेला नाही. Multibagger Stock
Rail Vikas Nigam Limited
वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशांत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी 30 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 65 रुपयांच्या पातळीवर आहेत. अशा प्रकारे, गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने 115% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
UCO Bank
गेल्या वर्षभरात युको बँकेच्या शेअर्सनेही गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या होळीपासून आतापर्यंत या शेअर्सची किंमत जवळपास अडीच पटीने वाढली आहे. वर्षभरापूर्वी 11.50 रुपयांवर असणारे हे शेअर्स आता 27.30 रुपयांवर आले आहेत. Multibagger Stock
Indian Bank
इंडियन बँकेच्या शेअर्समध्येही गेल्या वर्षभरात 115 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 1 वर्षापूर्वी 130 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 286 रुपयांच्या पातळीवर आहेत.
Apar Industries
गेल्या वर्षभरात या शेअर्सच्या किंमतींत साडेतीन पट वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी 600 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 2307 रुपयांच्या पातळीवर आहेत. अशा प्रकारे, या कालावधीत या शेअर्सने 300% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
Mazagon Dock
या शेअर्सने गेल्या 1 वर्षामध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. या कालावधीत या शेअर्सने 200 टक्क्यांहून अधिकची उसळी घेत 240 रुपयांवरून 735 रुपयांची पातळी गाठली आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/mazagon-dock-shipbuilders-ltd/mazdock/543237/
हे पण वाचा :
फोनचा Charger सॉकेटमध्ये तसाच ठेवल्याने वीज खर्च होते का ???
होळीला रंग खेळताना Smartphone पाण्यात पडला तर तातडीने करा ‘हे’ काम
Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Recharge Plans : ‘या’ टेलिकॉम कंपन्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत देत आहेत अनेक फायदे